LIVE UPDATES

कुणकेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 04, 2026 19:59 PM
views 32  views

देवगड :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी रत्नागिरी यांच्या सहकार्याने विभागीय शालेय वुशू स्पर्धा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे पार पडलेल्या विभागीय शालेय वुशू स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर प्रशालेच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या वजन गटात चमकदार कामगिरी करत,प्रशालेच्या  यशात मानाचा तुरा रोवला.

विभागीय स्पर्धेतील विजयी खेळाडू खालील प्रमाणे

1) 70किलोखालील वजन गटात कु. मृण्मयी संतोष धुरी -द्वितीय 

2) 56 किलोखालील वजन गटात कु. सुहानी महेश लब्दे -तृतीय 

3) 65 किलोखालील गटात कु. सुरक्षा योगेश शिंदे -तृतीय वरील सर्व खेळाडूंना  क्रीडाशिक्षक श्री बाळासाहेब ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष चंद्रकात घाडी, संस्था उपाध्यक्ष तुकाराम तेली, संस्था सचिव संकेत लब्दे , खजिनदार रावजी वाळके,संस्था पदाधिकारी, मुख्या. संजय राणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.