LIVE UPDATES

जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात शेठ म. ग. हायस्कुल देवगडचे 'श्वास' प्रथम

जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळांच्या हस्ते सन्मान
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 04, 2026 11:58 AM
views 64  views

वेंगुर्ला :  जिल्हा परिषद शिक्षण विभाग सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात देवगड येथील शेठ म. ग. हायस्कुलच्या 'श्वास' या नाटकाने बाजी मारत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर एस. एस हायस्कुल कणकवली यांच्या 'स्मार्ट व्हर्जन' नाटकाने द्वितीय व कुडाळ हायस्कुल कुडाळच्या 'मिशन तारांगण' ने तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी विजेत्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नगरसेविका रिया केरकर, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे यांच्या सहित इतर मान्यवर उपस्थित होते. 

या विज्ञान नाट्य महोत्सवाचे परीक्षण एस आर एम महाविद्यालय कुडाळचे प्राध्यापक डॉ. रविंद्र ठाकूर, कणकवलीचे प्राध्यापक शेखर गवस, यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचे प्राध्यापक अमर प्रभू यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले. या विज्ञान नाट्य महोत्सवाला विद्यार्थी, पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.