LIVE UPDATES

मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचं निधन

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 04, 2026 12:10 PM
views 45  views

कणकवली : मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एस. टी. सावंत यांचे आज रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

एस. टी. सावंत यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून काम करताना विविध विकासकामांना चालना दिली. तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन व सहकार्य केले.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.एस. टी. सावंत यांची अंत्ययात्रा आज रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजल्यानंतर जाणवली येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.