
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील कामळेवीर बूथ क्रमांक २९ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या सकारात्मक उपक्रमांची तसेच नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे उपस्थितांनी सामूहिक श्रवण करून विविध उपक्रम व मार्गदर्शन जाणून घेतले.
यावेळी नितीन मांजरेकर (पंचायत समिती सदस्य तथा ओबीसी मोर्चा उपजिल्हाप्रमुख, सिंधुदुर्ग), रामचंद्र मांजरेकर गुरुजी, सतीश मांजरेकर, रत्नप्रभा मांजरेकर, दाजी मांजरेकर, विलास धुरी, श्री. वाडकर, दाजी धुरी, प्रथमेश धुरी, गायत्री मांजरेकर, गोपाळकृष्ण मांजरेकर, आपा धुरी, श्रीकृष्ण मांजरेकर, रवींद्र मांजरेकर आणि राजाराम धुरी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामकाज, आगामी उपक्रम तसेच बूथस्तरावरील विविध विषयांवर चर्चा केली.










