LIVE UPDATES

मस्जिद मोहल्ला काँग्रेस तर्फे कुडाळात वनराई बंधारा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 02:49 PM
views 63  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : कुडाळ येथील मस्जिद मोहल्ला काँग्रेस तर्फे रेल्वे स्टेशन रोडवरील पुलाजवळ पाण्याचा साठा व्हावा आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने नुकताच बंधारा घालण्यात आला. या सामाजिक व विकासकामात मस्जिद मोहल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.तबरेज शेख, मुराद शेख, अयाज आडलकर, शाहिद शेख, आमीन आडलकर, वहाब खान, आरिफ खान, इरफान जमादार, आयन आडलकर, सुफियान पटेल, कादर खान, समीर खान,अबरार शादाब शेख आदी उपस्थित होते.मस्जिद मोहल्ला काँग्रेसच्या या पुढाकारामुळे परिसरातील पाणीसमस्येवर मात होण्यास मदत होणार असून, कार्यकर्त्यांच्या या श्रमदानाचे व सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.