
कणकवली : खारेपाटण तालुका कृती समितीच्या वतीने 7 ऑक्टोबर रोजी वनराई बंधारा बांधण्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती व पालकमंत्री नितेश राणे यांच्या वनराई बंधारे बांधण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत खारेपाटण येथील सर्व ग्रामस्थ, व्यापारी संघटना ,रोटरी क्लब ,हायस्कूल शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्यातून खारेपाटण चिंचवली रोड अवेरा पहा येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत उपाध्यक्ष मंगेश गुरव खजिनदार महेश कोलसूलकर सचिव संतोष पाटणकर पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष सुहास राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच समितीचे सदस्य प्रवीन लोकरे सुधीर कुबल व्यापारी संघाचे अध्यक्ष चेतन हुले रोटरी क्लबचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे खारेपटन शेठ .न. म विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप पर्यवेक्षक राऊत सर ,कोकाटे सर , कोकाटे मॅडम, महेंद्र मॅडम, हरियाण सर ,भिसे सर , वरूनकर सर , जाधव सर यांनी उपस्थित राहत योगदान दिले.
या प्रसंगी कणकवली पंचायत समितीचे विकास अधिकारी अरुण चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव ग्राम विकास अधिकारी श्री वरवडेकर ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले यांनी भेट दिली व कामाचे कौतुक केले.
या बंधाऱ्याच्या माध्यमातून खारेपाटण तालुका समितीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपले सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन आम्हाला असते सांगत उपस्थितांचे आभार मानले.












