
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाणे विभागातून ठाणे येथील भगवती विद्यालयाची विद्यार्थीनी कु. वैष्णवी प्रणव पणदूरकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या परीक्षेत कु. वैष्णवीने उत्कृष्ट गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून शिष्यवृत्ती धारक होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल भगवती विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, संस्थाचालक तसेच पालक व ठाणे करांकडून तिचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कु. वैष्णवी प्रणव पणदूरकर ही सावंतवाडी येथील वकील ॲड. सुभाष पणदूरकर यांची नात आहे.










