LIVE UPDATES

शिष्यवृत्ती परीक्षेत अ. रा. विद्यालयाचे घवघवीत यश

वैदेही कडू जिल्ह्यात प्रथम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 03, 2026 20:22 PM
views 11  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.विद्यालयातील वैदेही विवेकानंद कडू हिने ग्रामीण सर्वसाधारण गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सांची भीमराव कांबळे हिनेही जिल्ह्यात ५३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी  अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर तसेच बाह्य परीक्षा विभाग प्रमुख एस. व्ही. भोसले यांनीही यशस्वी विद्यार्थिनी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.