
सावंतवाडी : इयत्ता पाचवी शिष्यवृती परीक्षेत पीएमश्री सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर सावंतवाडी नं. 2 ने ऐतिहासिक कामगिरी केली. शैक्षणिक वर्षात 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनविणारी जिल्ह्यातील पहिली शाळा बनली असून न भूतो न भविष्यती अशी कामगिरी शाळेन केली आहे.
शाळेचा विद्यार्थी आराध्य अमोल आपटे शहरी शिष्यवृत्तीधारकमध्ये राज्यात नववा तर जिल्ह्यात पहिला आला आहे. पूर्वांग कुणाल माळगावकर जिल्ह्यात 5 वा, सई शिवाजी आरेकर जिल्ह्यात 7 वी, सुरेश वरक जिल्ह्यात 8 वा, नील पांडुरंग थोरात जिल्ह्यात 14 वा, श्रीशा मिहिर प्रभुदेसाई जिल्ह्यात 16 वी, स्वामिनी अजित कोळी जिल्ह्यात 19 वी, साहिल शाहू खरात जिल्ह्यात 20 वा, दुर्वा अजित सावंत जिल्ह्यात 25 वी, श्रीकर मंदार शुक्ल जिल्ह्यात 27वा, मैत्रेय राजाराम दळवी जिल्ह्यात 36 वा, मीरा मकरंद देसाई 39 वी, नील प्रशांत नार्वेकर 42 वा तर सानवी चेतन देसाई 53 वी आली आहे. गुणवंत मुलांचे, त्यांच्या पालकांचे मार्गदर्शक शिक्षक रणजीत सावंत, श्रीम. पूजा ठाकूर , श्रीम प्राची ढवळ, भावना गावडे, श्रीम हेमांगी जाधव, तेजस बांदिवडेकर या सर्वांचे तसेच केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांचे अभिनंदन शाळा समितीचे नंदू गावडेंसह समितीने केले आहे.










