LIVE UPDATES

Vaibhavwadi Water Conservation : दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभारूया

जलतारा, शोषखड्ड्यांच्या कामांत नागरिकांनी सहभागी व्हावे; सभापती सिद्धेश रावराणे यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 03, 2026 07:35 PM
views 23  views
Siddhesh Ravrane inaugurates Jaltara and soak pit water conservation works at Sadure in Vaibhavwadi.

वैभववाडी : भविष्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत संचय करण्यासाठी प्रत्येक गावात जलतारा आणि शोषखड्ड्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. यासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेऊन जलसंधारणाची लोकचळवळ उभारावी, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत वैभववाडी तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सडूरे-शिराळे ग्रामपंचायतीच्या वतीने सडूरे येथे जलतारा आणि शोषखड्डे कामांचा शुभारंभ सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, सरपंच दिपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, रितेश सुतार पंचायत समितीचे अधिकारी तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

श्री. रावराणे म्हणाले, यावर्षी जलसंवर्धन करणं गरजेचं आहे.त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.भविष्यातील पाणीटंचाईच्या संकटांवर मात करणे ही कामे पूर्ण होण आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जलतारा आणि शोषखड्ड्यांची कामे करून घ्यावीत, असे आवाहन रावराणे यांनी केले.

या उपक्रमांतर्गत किमान ४० गुंठे जमीन असलेल्या जमीनधारकांना जलतारा बांधण्यासाठी ५ हजार ५०० रुपये, तर शोषखड्डा बांधण्यासाठी २ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानांतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहे.तालुक्यासाठी १ हजार ७०० जलतारा आणि ३ हजार ५०० शोषखड्डे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते जमिनीत मुरविण्यासाठी या कामांचा मोठा उपयोग होणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासह भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 


ताजी बातमी

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Forest Department seizes tiger teeth and leopard claws during a wildlife trafficking crackdown in Kudal.
Kudal Wildlife Smuggling Racket : कुडाळ बस स्थानकावर वाघनखे, दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise inspects grass harvesting and fodder storage demonstration at Kasal.
कसाल येथील गवत कापणी प्रात्यक्षिकास जिल्हाधिकारी, सीईओ, उपाध्यक्षांनी दिली भेट
November 03, 2026