LIVE UPDATES

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त 'ज्ञानसंपदा पुस्तक बँकेचे' अनावरण

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 13:44 PM
views 44  views

  • विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

दोडामार्ग : जि. प. केंद्रशाळा दोडामार्ग क्र. १ येथील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारलेल्या "ज्ञानसंपदा पुस्तक बँकेचे" अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, नगरपंचायत शिक्षण सभापती संजना म्हावलणकर, जिल्हा सरचिटणीस भैया पांगम, नगरसेविका संध्या प्रसादी, दिक्षा महालकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पुढाकारातून पुस्तके संकलित करून त्यांची नोंदणी, वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याचा संकल्प केला आहे. या पुस्तक बँकेसाठी विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांकडून नवीन तसेच चांगल्या स्थितीतील जुनी पुस्तके भेट स्वरूपात स्वीकारण्यात येत आहेत.

या उपक्रमामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे आणि "विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी" हा आदर्श निर्माण करणे हा या पुस्तक बँकेचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत विद्यार्थ्यांच्या या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.