
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
या कॉलेजचा अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. सिव्हिल विभागातून सागर इंदप यांने 83.00 टक्के गुण मिळवून प्रथम, तृप्ती वंजारे हिने 83.00 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर शिवम परब यांने 79.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
त्याचप्रमाणे मेकॅनिकल विभागातील दुर्वांकुर सावंत याने 83.83 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वेदांग चव्हाण यांने 80.39 टक्के गुण मिळवून द्वितीय तर गजेंद्र टिक्कस यांने 79.89 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त व डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











