LIVE UPDATES

एसटी निवारा शेडचे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 15:46 PM
views 27  views

देवगड : देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर शिरगाव-तोरसोळे फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या एस.टी. निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच शिरगाव जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शीतल तावडे आणि सरपंच सौ. तेजस्विनी पवार यांच्या हस्ते फीत कापून एस.टी. निवारा शेडचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, राजेंद्र शेट्ये, संतोष फाटक, नंदू देसाई, मंगेश लोके, महेश पवार, वैभव साळसकर, सत्यवान भोगले, सुहास राणे, अरविंद पवार, ऋतुजा पवार, गायत्री पवार, रवींद्र पवार, दयानंद राणे, राकेश चौकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवीन एस.टी. निवारा शेडमुळे प्रवासी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना उन्हाळा व पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन केले.