LIVE UPDATES

नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला हातभार

कुंब्रलमध्ये वह्या वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 15:52 PM
views 17  views

दोडामार्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कुंब्रल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दिलखुश उर्फ दौलतराव देसाई आणि मित्र मंडळाच्या वतीने कुंब्रल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंब्रल नंबर १, २, ३ आणि ४ या चारही शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता कुंब्रल नंबर २ शाळेतून करण्यात आली. त्यानंतर कुंब्रलमधील सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दिलखुश देसाई, रोहन देसाई, संजय परब, वैभव सावंत, प्रदीप सावंत, रुपेश घोगळे, प्रमोद मळीक, आनंद परब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.