वैभववाडी : करुळ घाटात ऑईलगळतीमुळे दुचाकीस्वार घसरून तीन अपघात झाले. हा प्रकार आज ( ता. १ डिसेंबर ) सकाळी घाटात घडला. या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली आहे.
करुळ घाटात अज्ञात वाहनातून ऑईलगळती होऊन ते रस्त्यावर पडले होते. यामुळे संपूर्ण रस्ता निसटता झाला होता. दरम्यान या मार्गावरून सकाळी ये जा करणारे दुचाकीस्वार या ऑईलवरून घसरून पडले. तीन दुचाकींचा याठिकाणी अपघात झाला. या दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातांची कोणतीही नोंद उशिरापर्यंत पोलीस स्थानकात झाली नव्हती.