
देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथे दीक्षित फाऊंडेशन पुरस्कृत, स्व. नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ,मंजिरी नीलकंठ दीक्षित यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेत खुल्या गटातून पांडुरंग करंबेळकर,कुमार गटातून प्रांजली महेश कानेटकर, तर बालगटातून मंत्रा नितीन कोळंबकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यावेळी माजी आमदार अॅड.अजित गोगटे म्हणाले की, गीतगायन स्पर्धेमुळे दीक्षित फाऊंडेशनने कलाकारांसाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.या स्पर्धेमुळे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. गीतगायनामुळे आरोग्य सुदृढ राहते व एकाग्रता वाढते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निरंजन दीक्षित म्हणाले की, गीतकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा व त्यांना प्रकाशझोतात आणावे,हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.अल्पावधीतच या स्पर्धेला व्यापक प्रतिसाद मिळालाअसून,तालुकास्तरावरील ही स्पर्धा आज राज्यस्तरावर पोहोचली आहे.वितरणप्रसंगी माजी आमदार अॅड. अजित गोगटे,दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित,बेडेकर उद्योग समूहाचे अजित बेडेकर,अपर्णा बेडेकर, मदन सोमण,परीक्षक नीलकंठ गोखले, शीतल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली तीन वर्षे दीक्षित फाऊंडेशनच्या वतीने वाडा येथील दत्त मंगल कार्यालयात या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विविध भागांतून स्पर्धक सहभागी झाले होते. सलग दोन दिवस ही स्पर्धा पार पडली.खुल्या गटाचे निकाल :
प्रथम – पांडुरंग करंबेळकर, द्वितीय – श्रुती सावंत, तृतीय – वैष्णवी कोपरकर उत्तेजनार्थ – सानिया वेलांगी, शौरीन देसाई, उत्तरा केळकर, सुनील गोवेकर, विश्वास गोठोस्कर,कुमार गटाचे निकाल प्रथम – प्रांजली कानेटकर, द्वितीय – रसिका संतोष वायंगणकर,तृतीय – कौस्तुभ हर्षद जोशी,उत्तेजनार्थ – हिमांशू नारायण चव्हाण, श्लोक चिंतामणी कल्याणकर, बालगटा मध्ये प्रथम मंत्रा नितीन कोळंबकर द्वितीय – शौनक विवेक वेलणकर, तृतीय – सौम्या पंकज बावधनकर, उत्तेजनार्थ – आदिश अमेय कोरगांवकर, वेद नारायण चव्हाण, अभंग आनंद मालपेकर.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पर्धा समितीचे हर्षद जोशी, संदीप फडके, प्रियांका वेलणकर, मानसी करंदीकर, राधिका काणे, सर्वेश बापट यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण दातार यांनी केले, तर आभार प्रियांका वेलणकर यांनी मानले. यावेळी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.शीतल धर्माधिकारी व नीलकंठ गोखले यांनी काम पाहिले.










