
देवगड : देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका आफरीन वसीम पठाण यांनी राज्यस्तरीय २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक या असलेल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.
'अनुभूतीतून अध्ययनाचा घेतला आम्ही ध्यास- सृजनाचा सोहळा झाला मोकळा तास' हा नवोपक्रम सादर केलेला होता. या नवोपक्रमाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी त्यांच्या नवोपक्रमाची निवड झालेली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबईच्या पदाधिकारी तसेच आणि स्थानीय संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी आणि पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.










