
कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय जिल्हा ग्रंथालय कुडाळ येथे होणार आहे.
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी देखील पत्रकार समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या अंतर्गत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तरीय मर्यादित आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक रू. १०००/-, द्वितीय क्रमांक रू.७००/-, तृतीय क्रमांक रू. ५००/-, व उत्तेजनार्थ रू. ३००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी पुरस्कृत केली आहेत.
स्पर्धेसाठी नियम व अटी ठेवण्यात आलेल्या असून ही स्पर्धा ही इयत्ता नववी ते बारावी या गटामध्ये होणार आहे. सादरीकरणासाठी सात मिनिटाची वेळ असणार आहे. स्पर्धेसाठी खालील पैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाने सादरीकरण करायचे आहे.
यामध्ये विषय
१] सोशल मीडिया चिंता व चिंतन
२] मोबाईल विधायक की विघातक.
३] भारतीय शेतकरी बळी की राजा
स्पर्धेसाठी तालुका पत्रकार समितीचे खजिनदार अजय सावंत मोबाईल नंबर ९४०५९२४५४८ यांचे कडे दिनांक १५ जानेवारी दुपारी २ वाजेपर्यंत नावे द्यावीत. तसेच स्पर्धे बाबत अधिक माहितीसाठी पत्रकार समिती अध्यक्ष
विजय पालकर मोबा. ९४२३३०३३४३ सचिव विठ्ठल राणे ९४०४७५३४४० यांच्याशी संपर्क साधावा. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका पत्रकार समितीकडून करण्यात आले आहे.










