
वैभववाडी : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्याबरोबरच भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील नदीवर दोन बंधारे बांधण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे आणि भाजप युवा मोर्चा, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्यांमधील पाण्याची पातळी कमी होत असून भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचे संवर्धन करण्यासाठी बंधारे बांधण्यात आले. शुक नदी व कासारव्हाळ येथे हे बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे नदीपात्रातील पाणी अडविले जाणार असून त्याचा फायदा परिसरातील भूजल पातळी वाढण्यास होण्याची अपेक्षा आहे. तसेच उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आशिष रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, श्रेयस नेवरेकर, आदित्य चव्हाण, अक्षय मोहिते, श्रेयस रावराणे, शुभम रावराणे, विनय राणे, सागर इंदप यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.











