LIVE UPDATES

Chiplun News : तुरंबवच्या श्री शारदादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 05, 2026 12:46 PM
views 24  views

चिपळूण : श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट, तुरंबव यांच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत देवीचे दर्शन, रात्री ९ वाजता देवीची महाआरती, रात्री १०.३० व ११.३० वाजता पारंपरिक जाखडी नृत्य, तसेच रात्री ११.३० पासून संततीविषयक नवस करणे व फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत. सोमवार, १२ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दररोज रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्री ९ वाजता महाआरती, रात्री १०.३० व ११.३० वाजता जाखडी नृत्य आणि त्यानंतर संतती विषयक नवस करणे व फेडण्याचा कार्यक्रम होईल.

मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाची सांगता होणार असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत सोने लुटणे कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता महाआरती, त्यानंतर रात्री १०.३० व ११.३० वाजता पारंपरिक जाखडी नृत्य, रात्री १२ नंतर संतती विषयक नवस करणे व फेडणे आणि त्यानंतर श्री गौरी देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

दरम्यान, रात्री ११ वाजता नवस करणे अथवा फेडणे यांचे काम सुरू झाल्यानंतर देवीचे दर्शन केवळ मुखदर्शनाच्या स्वरूपात भाविकांसाठी खुले राहाणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट, तुरंबव यांच्यावतीने करण्यात आले आहे.