
सिंधुदुर्गनगरी : समाजातील शेवटच्या घटकाचा विकास आणि कल्याण होणे, तसेच विकासाची फळे समाजातील सर्वात शेवटी उभ्या असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजेत, ही अंत्योदयाची संकल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. त्यांच्या या विचारांना अनुसरून समाजातील गरीब व गरजू घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळेच २५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन ‘अंत्योदय दिन’ म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बालाजी शेवाळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
गरीब व गरजू लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘अंत्योदय अन्न योजना’ या योजनेचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अन्न योजना’ असे करण्यात आले आहे. अंत्योदय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात अंत्योदय अन्न शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










