LIVE UPDATES

आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर कोसळले झाड

वाहतूक ठप्प
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 18:56 PM
views 243  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : माडखोल-धवडकी येथे आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी झालेल्या वादळ सदृश्य वाऱ्यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.तसेच शेजारी असलेल्या लोहार शाळेचेही नुकसान झाले आहे. ही घटना आज साडेचार वाजता घडली असून त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थ व बांधकाम कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.