LIVE UPDATES

देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी हायस्कूल प्रथम

विशाल परब मित्रमंडळाच्यावतीने आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 15:08 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : 'हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावंतवाडीत तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त विशाल परब मित्रमंडळाच्यावतीने शालेय स्तरावरील देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. 

तर कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडीने द्वितीय, तर मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडीने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक मळगाव इंग्लिश स्कूल आणि राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी यांना देण्यात आले. विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दर्जेदार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार दीपक केसरकर यांनीही या स्पर्धेचे कौतुक केले.