
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेत कॉग्रेसचे तौकीर शेख नगरसेवक पदी विजयी झाले. प्रभाग १ मधून भाजपचे माजी नगरसेवक राजू बेग यांचा ९५ मतांनी त्यांनी पराभव केला.
यानंतर प्रभागात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री. शेख म्हणाले, जनतेन धनशक्तीला लाथ मारत आम्हाला साथ दिली. येणाऱ्या काळात आम्ही जनतेचा विश्वास सार्थकी लावू असा विश्वास कॉग्रेसच्या तौकीर शेख यांनी व्यक्त केला. यावेळी कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












