
सावंतवाडी
भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाला ५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सहकार मंत्रालय स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारत मंडपम ,नवी दिल्ली येथे होणाऱ्या या कार्यक्रमास महाराष्ट्रातून एकूण ६४ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेचे प्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार असून सिंधुदुर्गातील ८ पदाधिकाऱ्यांची सहकार आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी ( नोडल अधिकारी ) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे . यामध्ये जामसंडे विकासचे चेअरमन प्रकाश गोगटे , खारेपाटण विकासचे चेअरमन रवींद्र जठार, तेंडोली विकासचे चेअरमन संजय प्रभूतेंडोलकर , मठ बुद्रुक विकासचे चेअरमन सतीश परुळेकर , कोलगाव विकासचे चेअरमन वीरेंद्र धुरी , कोलझर विकासचे चेअरमन तातोबा देसाई , श्री स्वयमेश्वर विकास मठचे चेअरमन सुभाष बोवलेकर , आचिर्णे विकासचे चेअरमन जयसिंग रावराणे यांचा समावेश करण्यात आल्याचे नाबार्डकडून कळविण्यात आले आहे .या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात प्रतिनिधींचे योग्य व्यवस्थापन व समन्वय राखण्याच्या जबाबदाऱ्या या नोडल ऑफिसर्स वर राहणार आहे .











