LIVE UPDATES

पुरात वाहून गेलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

करूळ येथे पहाटे घडली होती घटना : तब्बल आठ तासांनी संपली शोध मोहीम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 17:22 PM
views 20  views

वैभववाडी : करूळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (६०) हे मंगळवारी सकाळी पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली होती. तब्बल आठ तासांच्या शोध मोहीमेनंतर सदानंद कदम यांचा मृतदेह सापडला आहे. सह्याद्री जीव रक्षक टिम, पोलीस, महसूल प्रशासनाकडून सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात आली होती. अखेर तब्बल आठ तासांनी मृतदेह मिळाल्यानंतर ही शोध मोहीम थांबविण्यात आली.

करुळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६०) हे मंगळवारी सकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. शेताकडे जात असताना नदीतील पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात आले. शोधमोहीम राबविल्यानंतर सायंकाळी ४ वाजता त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळापासून ३ ते ३.५ किलोमीटर अंतरावर एडगाव हद्दीत जांभळीचा माळ येथे मृतदेह सापडला.