LIVE UPDATES

आपल्या गावाचा अभिमान व शाळेबद्दल आत्मीयता बाळगा

उद्योजक डॉ. दीपक परब यांचे प्रतिपादन ; मसुरेत गुणवंतासह शिक्षकांचा सन्मान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 28, 2026 17:58 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारी मसुरे एज्युकेशन सोसायटी ही जिल्ह्यातील एकमेव संस्था असावी. विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवावे. आपल्या गावाचा अभिमान व शाळेबद्दल आत्मीयता बाळगा. तुमच्या यशामध्ये संस्था, शाळा आणि पालकांचा मोठा वाटा आहे. हे यश म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात आहे. माजी विद्यार्थी संघ चांगला असलेल्या संस्थेला उत्तम भविष्य आहे, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यांनी केले.

मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल येथे जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रथम दोन क्रमांक आणि मसुरे केंद्र गुणवंत विद्यार्थी यांचा रोख पारितोषिक देऊन गुणगौरव आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, उद्योजिका राधिका परब, विठ्ठल लाकम, प्रमोद खाडिलकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, डॉ. सुधीर मेहेंदळे, संजय बागवे, अर्चना कोदे, अरुण बागवे, प्रदीप भोगले, पंढरीनाथ नाचणकर, अप्पा परब, एस. आर. कांबळे, ज्ञानदेव पाटील, बाळू परब, राणे, उदय बागवे, वर्षाराणी अभ्यंकर, शेखर बागवे आदी उपस्थित होते.

कै. मदन बागवे शिक्षण निधी आणि दात्यांच्या ठेवींमधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब यांनी, या पारितोषिकांमागे पालक, शिक्षक यांचे श्रम आहेत. ही यशाची नवी सुरुवात आहे, असे सांगितले. विठ्ठल लाकम म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पालकांनी लक्ष द्यावे. यशासाठी कठोर परिश्रम करा.

बागवे हायस्कुलचे शिक्षक समीर नाईक यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार तर मानसी दीपक पेडणेकर, कुशल सावंत यांना होतकरू विद्यार्थी म्हणून बक्षीस देण्यात आले. यावेळी विश्वनाथ परब, शशांक पिंगुळकर, शहाजी चौगुले, रमेश पाताडे, विशाखा जाधव, समीर नाईक, आर्या भोगले, प्रगती मोरे, मंदार पाटील, सायली म्हाडगुत, भानुदास परब, अनिल मेस्त्री, हरी ठाकुर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद पेडणेकर यांनी, प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर यांनी तर आभार एस. आर. कांबळे यांनी मानले.