
कणकवली : शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी व एसटी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रल्हाद सिताराम सावंत (८०, मुळ रा. भिरवंडे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सुन, नातवंडे, भाऊ भावजय असा परिवार आहे. कणकवली येथील अल्पबचत एजंट प्रतिभा सावंत यांचे पती तर कनेडी येथील बिअर शॉपी व्यावसायिक प्रमोद सावंत यांचे वडील होत. बुधवारी सकाळी ९ वा. त्यांच्यावर भिरवंडे येथील स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्यात येणार आहेत.











