LIVE UPDATES

इस्रोमध्ये सरकारी नोकरीची संधी! विविध पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

ISRO Notification 2026 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) नवी दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यासह विविध आठ विभागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 18:38 PM
views 41  views

ISRO recruitment 2026 : इस्रोमध्ये (ISRO) नोकरी करण्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) नवी दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यासह विविध आठ विभागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या मोहिमेद्वारे इस्रो 'सहाय्यक' (Assistant), ज्युनिअर पर्सनल असिस्टंट' (Junior Personal Assistant), 'अप्पर डिव्हिजन क्लर्क' (Upper Division Clerk) आणि 'लिपिक-टंकलेखक' (Stenographer), असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती), ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागाअंतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) अशा पदांवरील २०० हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच जारी करण्यात आली आहे.

इस्रोमधील या भरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी २७ जुलै पासून सुरुवात झाली असून १६ ऑगस्टपर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत.

प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, असिस्टंट या पदाकरीता 113 जागा, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट या पदाकरीता 81 जागा, उच्च श्रेणी लिपिक या पदाकरीता 22 जागा, स्टेनोग्राफर या पदाकरीता 10 जागा, असिस्टंट या पदाकरीता 17 जागा, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट या पदाकरीता 1 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • असिस्टंट या पदाकरीता 60 टक्के गुणांसह पदवी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • ज्युनिअर पर्सनल असिस्टंट या पदाकरीता 60 टक्के गुणांसह पदवी किंवा 60 टक्के गुणांसह कमर्शियल / सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा, स्टेनो टाईपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उच्च श्रेणी लिपिक या पदाकरीता 60 टक्के गुणांसह पदवी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • स्टेनोग्राफर या पदाकरीता 60 टक्के गुणांसह पदवी किंवा 60 टक्के गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियलप्रॅक्टिसमधील डिप्लोमा, स्टेनो-टाईपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट या पदाकरीता 60 टक्के गुणांसह पदवी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • ज्युनिअर पर्सनल असिस्टंट 60 टक्के गुणांसह पदवी किंवा 60 टक्के गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा, स्टेनो-टाईपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा व परिक्षा फी

या सर्व पदांकरीता 16 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे उमेदवाराचे वय असणे आवश्यक आहे. यामध्ये एससी, एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना 500 रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.