LIVE UPDATES

मालवणात बुधवारी तालुकास्तर ऊर्जा मित्र बैठक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 07:06 PM
views 53  views

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच वीज ग्राहक आणि महावितरण प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी मालवण येथे तालुकास्तरीय ऊर्जा मित्र बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ११ वाजता उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मालवण कार्यालय येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीस मालवण तालुक्यातील तक्रारदार वीज ग्राहकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये वीजपुरवठ्यातील अडचणी, वाढीव वीजबिले, बिलिंगमधील त्रुटी, मीटर दुरुस्ती व बदल, वीज खांब आणि तारा बदलणे, वीजविषयक तक्रारींची नोंद तसेच प्रलंबित तक्रारींचे निराकरण अशा विषयांवर चर्चा होणार आहे.

ग्राहकांना महावितरणच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, वीज वितरण सेवा अधिक पारदर्शक व्हावी, वीजविषयक जनजागृती वाढावी, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश आहे. 

तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्या वीजविषयक तक्रारी, समस्या, सूचना व अभिप्राय मांडण्यासाठी बैठकीत सहभागी व्हावे. तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक अर्ज व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहवे, अधिक माहितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण शाखेचे अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर (९४२२०५५०७५), सचिव नीळकंठ मालणकर, संघटक नितीन वाळके व वफा खान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण शाखेने केले आहे.