
देवगड : पंचायत समिती देवगड येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने नागरिकांना प्रदान केलेले मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेतील संविधानाचे महत्त्वपूर्ण स्थान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समिती देवगडचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








