
वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्यावतीने आज (ता.३१)स्वच्छोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शहरात स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली होती.नगरपंचायती समोर श लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचारी व शाळकरी विद्यार्थी यांनी सामुदायिक स्वच्छतेची शपथ घेतली.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार महीलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छोत्सव २०२३ हे अभियान राबविले जात आहे.या अभियानांतर्गत येथील वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीत हा स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.यानिमित्ताने शहरात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेऊन दत्तविद्यामंदीर च्या विद्यार्थ्यानी रॅली काढली.तसेच नगरपंचायत कार्यालयासमोर स्वच्छतेची सामुदायिक शपथ घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे,महीला बाल कल्याण सभापती यामिनी वळवी, सभापती राजन तांबे, नगरसेविका सुप्रिया तांबे, मुख्याधिकारी सुरज कांबळे, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.