
सावंतवाडी : 'कोकणसाद'च्या हॉली जॉली ख्रिसमस विशेषांकाचे प्रकाशन ख्रिस्ती धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हजारो ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. कोकणसादने केलेल्या या आकर्षक आणि माहितीपूर्ण विशेषांकाचे ख्रिस्ती बांधवांनी कौतुक केले.
कोकणसादनं प्रतिवर्षी नाताळच्या निमित्ताने विशेषांक आपल्या वाचकांच्या हाती देत असतो. यावर्षीच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे हा विशेषांक संपूर्ण मराठी भाषेत आहे. यात ख्रिश्चन धर्माची वाटचाल, इतिहास, सहकार, सामाजिक संस्थाच्या माध्यमातून चालवले जाणारे कार्य, धार्मिक उपक्रम यांचा समावेश यात आहे. नाताळ सणाची पार्श्वभूमी, प्रभू येशूची शिकवण याबाबतचे विशेष लेख यात आहेत. या अत्यंत माहितीपूर्ण आणि संग्राह्य विशेषांकाचे सर्वच ख्रिश्चन बांधवांनी स्वागत केले. कोकणसादने अत्यंत सुंदर अशा मांडणीत महत्वाच्या विषयांवरचे नामवंत लेखकांचे लेख दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक केले. यावेळी फादर ॲन्ड्रु डिमेलो, फादर मिलेट डिसोजा, फादर रिचर्ड साल्डना, फादर ॲमृत गोन्साल्वीस, फादर रॉजर डिसोझा, फादर रॉबिन डिसोझा, ग्रेगरी डॉन्टस, ॲगोस्तीन फर्नांडिस, कोकणसादचे प्रतिनिधी विनायक गांवस, आयटी हेड विद्देश धुरी, वितरण प्रतिनिधी अश्पाक शेख आदींसह हजारो ख्रिस्ती बांधव, कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचे संचालक, कॅथॉलिक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.














