सुनील गवस यांची मांगेली उपसरपंचपदी बिनविरोध निवड

Edited by:
Published on: February 17, 2026 20:00 PM
views 45  views

दोडामार्ग : मांगेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मंगळवारी ग्रामपंचायत सदस्य सुनील राजाराम गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सदैव कार्यरत असलेल्या या नेतृत्वाला बिनविरोध संधी देण्यात आल्याने कौतुक होत आहे.

ग्रामपातळीवर अडीच-अडीच वर्षांच्या ठरावानुसार तत्कालीन उपसरपंच कृष्णा सातू गवस यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठीमंगळवारी ग्रामपंचायत येथे निवडणूक घेण्यात आली.

सुनील गवस यांचीच बिनविरोध उपसरपंच पदी वर्णी लागल्याने आणि बिनविरोध निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सहकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल गवस यांनीही आभार व्यक्त केले आहेत.