LIVE UPDATES

जामसंडे येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 10, 2026 20:57 PM
views 44  views

देवगड : जामसंडे धोपटेवाडी येथील प्रणिता प्रकाश जोईल (वय ४५) यांचे गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता जोईल या गेले काही दिवस आजारी होत्या. त्यांच्यावर जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.

घटनेची फिर्याद प्रसाद अशोक मोरे (३५, रा. जामसंडे धोपटेवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.