LIVE UPDATES

आत्महत्यांचे प्रमाण थांबण्यासाठी मोती तालावला नेटची जाळी बसवा

पर्यटन व उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांची मागणी : लवकरच बोटिंगही करणार सुरु
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 10, 2026 20:23 PM
views 70  views
Mohini Madgaonkar

सावंतवाडी : मोती तलावात आत्महत्यांचे प्रमाण वाढलेलं असून हे प्रमाण थांबण्यासाठी संपूर्ण तालावला नेटची जाळी बसवावी अशी मागणी पर्यटन व उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी केली. तर नगराध्यक्षांनी देखील ही मागणी योग्य असून यावर निर्णय घ्यावा असा सकारात्मक प्रतिसाद दिला. 

विरोधकांकडून देखील सौ. मडगावकर यांच्या मागणीला संमती दर्शवली गेली. आत्महत्या होऊ नयेत किंवा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी ही संकल्पना सभागृहात मांडली. तसेच सिंधुरत्न योजनेमधून तलावात बोटी खरेदी करून मोती तलावात लवकरात लवकर बोटिंग सुरु करणार असल्याची माहिती सभापती मोहिनी मडगांवकर यांनी सभेत दिली