LIVE UPDATES

शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद सदानंद पवार शाळेचे यश

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 16:53 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

 देवगड : एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद सदानंद पवार शाळेचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कु.अनुश्री स्वप्निल पवार ही विद्यार्थिनी ८४ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात ९ वी , कु.वर्धन निवास शिंदे हा विद्यार्थी ७९.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात ४ था जिल्ह्यात २१ वा , कु.आराध्य उदय परब हा विद्यार्थी ७९.३३  टक्के गुण मिळवून तालुक्यात ५ वा जिल्ह्यात २२ वा, कु.रोशन केदार सावंत हा विद्यार्थी ८४.६६ टक्के गुण मिळवून तालुक्यात ६ वा जिल्ह्यात ४३ वा, कु.सुखदा सुमित नार्वेकर ही विद्यार्थिनी ७४ टक्के गुण मिळवून तालुक्यात ७ वी जिल्ह्यात ४७ वी असे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री प्रविण खडपकर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शिंगाडे, सर्व संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.