
दोडामार्ग : सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १, दोडामार्ग येथे शालेय विद्यार्थी व पालकांसाठी सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत "लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२" या विषयावर जनजगृती मोहीम अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मौल्यिक मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे सचिव आर. व्ही. नडगदळी व एस. ए. कुलकर्णी, प्र. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, दोडामार्ग तथा सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग - १ सावंतवाडी आणि दोडामार्ग यांच्या संकल्पनेतून तालुका विधी सेवा समिती, दोडामार्ग व वकील संघटना, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली.
या कार्यक्रमात दिवाणी न्यायालय (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी वर्ग - १ न्यायालय, दोडामार्गचे सह. अधीक्षक एम. डी. धुरी, ॲड. सोनू गवस, डॉ. रामदास रेडकर तसेच डॉ. कु. क्रांती बारसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नाईक, संस्थेचे सचिव श्री. दळवी, सहा. गटविकास अधिकारी श्री गवस, क. लि. एस. एस. मालवणकर हे उपस्थित होते.
ॲड. सोनू गवस, डॉ. रामदास रेडकर तसेच डॉ. क्रांती बारसकर यांनी पोक्सो कायदा (लैंगिक छळापासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२) बाबत उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे सुरक्षित बालपण, त्यांचे हक्क, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका याबाबतीत मार्गदर्शन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच पालकांनाही मुलांच्या सुरक्षिततेविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर सामाजिक बांधिलकी जपत दिवाणी न्यायालय (क.स्तर), दोडामार्ग येथील न्यायालयीन कर्मचारी वृंद आणि एस. ए. कुलकर्णी, प्र. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, दोडामार्ग तथा सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ सावंतवाडी आणि दोडामार्ग यांच्यामार्फत दोडामार्ग येथील २५ गरीब व होतकरू कुटुंबाना दिवाळीनिमित्त शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
दोडामार्ग तालुका विधी सेवा समितीच्या सामाजिक उपक्रमाचे, उपस्थित पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस डॉ. सुधीर देशपांडे यांचे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोसचे सचिव आर. व्ही. नडगदळी यांचे मार्गदर्शन लाभले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








