
सावंतवाडी : मुलांनी लहान विचारात न राहता आपले विचार मोठे ठेवावेत, वाचनाचा छंद लावावा, मोठ्या मोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावीत, त्यांचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त करत पुस्तके जगा, पुस्तके वाचा, असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी केले. वैश्य समाज सावंतवाडी व हिंदू वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास तालुक्यातील ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक रमेश भाट, युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, महिला अध्यक्षा तनुजा पोकळे, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक प्रतीक बांदेकर, नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, भेडशीचे उद्योजक बाबा टोपले, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेविका पुष्पलता कोरगावकर, कणकवली येथील साहित्यिक महेश काणेकर, पं. स. सदस्य प्रशांत सुकी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अरुण भिसे यांनी सावंतवाडी वैश्य भवनाबाबत चालू असलेल्या घडामोडींचा आढावा घेऊन आज या कार्यक्रमाला जशी ज्ञाती बांधवांनी उपस्थिती दर्शविली तशी उपस्थिती व एकी कायम ठेवून आपल्या समाजाची प्रगती साधूया असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार जठार म्हणाले,गरिबी हा शाप न मानता, वरदान ठरवून प्रगती साधावी, आपल्या देशात जे जे महापुरुष होऊन गेले ते सर्व गरिबीतूनच वर गेले आहेत असे सांगून, यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम यांची उदाहरणे देऊन अशा मोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावी असे मुलांना आवाहन केले. यावेळी विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्या बद्दल आमदार प्रमोद जठार यांचा वैश्य समाज व युवा संघटने तर्फे शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी साहित्यिका पूजा विकास गोवेकर यांनी समाज बांधवांनी असे सत्कार सोहळे ठेवून मुलांचे कौतुक करने, हा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला, माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, अवधूत नार्वेकर, साबाजी नार्वेकर, रघुनाथ कोरगावकर, श्री. आळवे , माजी नगराध्यक्ष श्वेता शिरोडकर, संतोष मुंज, सुनील मिशाळ, शैलेश गवडळकर, यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर, अण्णा म्हापसेकर, रविंद्र स्वार, तुषार कोरगावकर, नाना गवंडळकर, जयेश स्वार, माया पारकर, कृतिका कोरगावकर, मेधा डुबळे , सायली मुंज, संतोष बांदेकर, शरद सुकी, प्रणव शिरोडकर, बाळा शिरसाट, शेखर पारकर, नंदू पोकळे, ओमकार मळीक, शशांक मळीक, प्रसाद म्हापसेकर, सौ. अनिता भाट, कल्पना बांदेकर, अमित आरवारी, प्रशांत वाळके, कपिल कोरगावकर, सुनिल बांदेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सचित कुडतरकर, शंभु विरनोडकर, पल्लवी स्वार, सौ. अक्षया म्हापसेकर, गजानन कोदे, श्रीरंग म्हापसेकर, सौ. आरवारी, सौ. रिया रेडीज, डॉ. उमेश मसूरकर, दत्तराज सुकी, अनिल भिसे आदी उपस्थित होते. पुष्पलता कोरगावकर यांनी स्वागतपर भाषण केले. संजय म्हापसेकर, सौ. उमा टिळवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी मानले. यावेळी सुमारे ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैश्य समाज व हिंदू वैश्य वाणी युवा संघटनेच्यावतीने मडूरा येथील वैश्य समाजातील दोन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले.










