
सावंतवाडी : "जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करून ‘कोकणसाद’ने एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श पायंडा पाडला आहे. प्रशासन चालवताना आम्हाला या वृत्तपत्राचे नेहमीच सहकार्य लाभले असून, जिल्ह्याच्या विकासाच्या घोडदौडीत कोकणसादचे योगदान मोलाचे आहे. राजकारणी आणि पत्रकार हे एकमेकांना पूरक असून, लोकहिताच्या गोष्टी ओळखण्यासाठी पत्रकारांची मोठी मदत होते," असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. दैनिक 'कोकणसाद'च्या ३७व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
राजवाडा येथील बँक्वेट हॉलमध्ये या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्मार्ट लीडर पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे डॉ. सुधाकर ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी अभय राजू चंदनशिवे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. तर कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, मुख्याधिकारी वेंगुर्ले हेमंत किरुळकर, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहायक अभियंता श्रेणी १ सार्वजनिक बांधकाम विभाग अजित पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी, देवगड कौमुदी राजेंद्र पराडकर, कृषी अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ले प्रशांत चव्हाण, आयुष वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय मालवण डॉ. अनिरुद्ध सुधीर मेहंदळे, लवू बाजीराव आचरेकर, अधिव्याख्याता शिक्षण विभाग देवगड अजितकुमार सुभाष कोळी, उप कृषी अधिकारी रोशन सूर्यवंशी, सहायक अभियंता वर्ग २ सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिन पारकर महसूल सहायक ओरोस, महेश परब वरिष्ठ लिपिक, सभा अध्यक्ष मालवण नगरपरिषद, संजयकुमार वसंत ओरोसकर, विस्तार अधिकारी कुडाळ पंचायत समिती, अविनाश विलास पवार कनिष्ट अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड, डॉ. दिव्या विजय गवस 108 रुग्णवाहिका देवगड, कुंदन बाबा घाडी लिपिक, देवगड नगरपंचायत, प्रदीप आप्पा कदम, कनिष्ट लिपिक देवगड महसूल , सुधीर बळीराम बालम ग्रामपंचायत अधिकारी, ओरोस, सायली सातोसे, ग्रामपंचायत अधिकारी वेंगुर्ले यांना स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरेविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर, आध्यात्मिक गुरू श्री श्री श्री १०८ महंत गावडे काका महाराज, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, माजी जिल्हा परिषद सभापती जयेंद्र रावराणे, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत, वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक उपस्थित होते. प्रास्ताविक कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी केले. कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी भविष्यातील वाटचालीचा संकल्प मांडला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते कोकणसादच्या ‘बदलतं कोकण’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी 'कोकणसाद'च्या प्रामाणिक पत्रकारितेचे आणि विश्वासार्हतेचे भरभरून कौतुक केले. सागर चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, "आजच्या काळात माध्यम चालवणे सोपे राहिलेले नाही, मात्र तरीही लोकहिताचा आणि विश्वासार्हतेचा वारसा कोकणसादने जपला आहे," यासाठी फोमेंतो समूहाचे विशेष कौतुक करावे लागेल, असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी लोकांशी सातत्याने चांगला संवाद ठेवण्याचे आवाहन केले. "जर संवाद नसेल, तर लोकांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यम करते. आमचे सरकार पारदर्शक असून चुकीच्या गोष्टी आम्हाला करायच्या नाहीत. म्हणूनच मी स्वतः आंदोलकांशी थेट संवाद साधतो. कोणावरही अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली. याच वेळी त्यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता जोरदार निशाणा साधला. "ज्यांना जिल्ह्याच्या परिस्थितीबाबत काहीच माहिती नाही, ते सभागृहात केवळ कागद वाचून भाषणे करत आहेत. वैयक्तिक जमिनी विकत घेणाऱ्यांनाही ‘भू-माफिया’ म्हणत सुटले आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कौतुकासाठी कोकणसादने वेळ दिला, कामाची दखल घेतली. जिल्हाधिकारी म्हणून या उपक्रमाचे कौतुक वाटते. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याच काम कोकणसादची टीम करत असून तो प्रश्न उचलून धरण्याचे कौशल्य आपल्या टीमकडे आहे.
यावेळी युवराज लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, महंत गावडेकाका महाराज, जयेंद्र रावराणे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत कोकणसादला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य उपसंपादक जुईली पांगम आणि उपसंपादक अनुजा कुडतरकर यांनी केले. तर सहाय्यक संपादक कृष्णा ढोलम यांनी आभार मानले.
यावेळी युवराज लखमराजे भोंसले, पं. स. उपसभापती गौरव मुळीक, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सभापती सुधीर आडिवरेकर, प्रतिक बांदेकर, आनंद नेवगी, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. दिनेश नागवेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, मधूकर देसाई, सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, मिसबा शेख, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, ॲड. प्रणिता कोटकर, कल्पना बांदेकर, धीरेंद्र होळीकर, समीर वंजारी, सचिन हरमलकर, संतोष गांवस, गुरु मठकर, गणेश मर्गज, प्रा. शैलेश नाईक, लक्ष्मण कदम, मंगल नाईक जोशी, तन्वी परब, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, निलम कुमठेकर, सिद्धेश किनळेकर, बाळा नमशी, हेमंत मराठे, हरिश्चंद्र पवार, रूपेश हिराप, निखिल माळकर, विराग मडकईकर, संतोष राऊळ, स्वानंदी पाटील, संतोष तळवणेकर, रमेश बोंद्रे, महेंद्र पटेल,समीर वंजारी, दिलीप भालेकर, पांडूरंग काकतकर, संतोष वैज, समृद्धी विर्नोडकर, संतोष पालेकर, सुशील चौगुले, रूपेश पाटील, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, प्रथमेश गावडे, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, तनुजा पोकळे, प्रसाद अरविंदेकर, रवी जाधव, डॉ. राजेश नवांगुळ, नितीन सांडये, प्रसाद महाले, बांदा पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, स्वानंदी पाटील, रामदास पारकर, सीमा मठकर, अरूण वझे, दीपक पटेकर, जगदिश मांजरेकर, जयंत बरेगार, रूपा मुद्राळे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सीमा मठकर, रामचंद्र कुडाळकर, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, कल्याण कदम, संजय लाड, बाळासाहेब बोर्डेकर, गौरव शिर्के, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, दीपक गांवकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, ॲड. अनिल केसरकर, बी.एन. रेडकर, संजय पिळणकर, आबा कोटकर, बाबुराव चव्हाण, राजन कुडतरकर, उमेश सावंत, ॲड. संतोष सावंत, पराग मडकईकर, विराग मडकईकर, विनोद चव्हाण, पी.बी. चव्हाण, किशोर चिटणीस, जितेंद्र मोरजकर, राजू केळुसकर, आनंद परूळेकर, उद्योजक रमेश भाट, संतोष मुंज, शैलेश गवंडळकर, नित्यानंद कोरगावकर, प्रसाद नार्वेकर, मेहर पडते, ऋतिक कोरगावकर, प्रथमेश टोपले, तहसीलदार सुर्यकांत पाटील, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, निवृत्त शिक्षक शरद नारकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, उद्योजक परशुराम इस्वलकर, डॉ चंदन धावले, मुख्याधिकारी गौरी पाटील
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, रोशन यशवंत सुर्यवंशी सहाय्यक अभियंता, अविनाश विलास पवार, लवू बाजीराव आचरेकर शिक्षण विभाग अभिव्याख्याता कुंदन बाबा घाडी देवगड जामसंडे नगरपंचायत लिपिक प्रदीप आप्पा कदम देवगड तहसीलदार वरिष्ठ लिपीक हे उपस्थित होते. तसेच यावेळी बिझनेस संपादक संदीप देसाई, जाहिरात व्यवस्थापक समीर सावंत, सहाय्यक संपादक कृष्णा ढोलम, चिफ रिपोर्टर विनायक गांवस, उपसंपादक लक्ष्मण आडाव, उपसंपादक भगवान शेलटे, मयुरेश राऊळ, प्रसाद कदम, सिंधुदुर्ग प्रतिनिधी लवू म्हाडेश्वर, वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब, वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे, दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब, देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे, स्वप्नील लोके, कुडाळ प्रतिनिधी निलेश ओरोस्कर, कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर, उमेश बुचडे, अकाउंटंट ओंकार नाईक, आर्टिस्ट अविनाश बांदेकर, रविकिरण राणे, मेघनाथ सारंग, आयटी हेड विद्येश धुरी, कॅमेरामन साहिल बागवे, साहिल दहीबावकर, रोहा प्रतिनिधी रूपेश रटाटे, विनायक खोटलेकर आदी उपस्थित होते.










