LIVE UPDATES

ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांना स्टार आयकॉन पुरस्कार

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 12:49 PM
views 21  views

सावंतवाडी : तालुक्यातील बांदा - कास येथील ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांना त्यांच्या पत्रकारितेतील सामाजिक योगदानाबद्दल स्टार आयकॉन पुरस्कार २०२६ जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह पुणे - बिबवेवाडी येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मंगल कामत या गेली ३३ वर्षे  पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सामाजिक , कला , क्रिडा, गुन्हेगारी या विषयांवर लेखन केले आहे.