LIVE UPDATES

Ratnagiri News : मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शुभेच्छापत्र, आकाशकंदील

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 02:55 PM
views 103  views
Handmade Diwali diyas, lanterns and handicrafts made by students of Abhyankar Deaf School in Ratnagiri

रत्नागिरी : दिवाळीची चाहूल लागल्यानंतर आपले दिव्यांगत्व विसरून विद्यार्थी कलात्मक वस्तू साकारण्यास सुरवात करतात. येथील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात हस्तकलेतून शुभेच्छापत्र, टाकाऊतून साहित्यातून विविध शो पीस, पणत्या, मातीपासून मावळे, रंगीबेरंगी आकाशकंदिल, लाकडी तुकड्यांसून कलात्मक घड्याळे, की- चेन्स, स्टॅंड कापडी पिशव्या अशा हर तऱ्हेच्या वस्तू साकारण्याचे काम सुरू आहे. यंदा शाळेच्या दिवाळी प्रदर्शनाचे ४१ वे वर्ष आहे. नावीन्यपूर्ण वस्तूंचे हे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे लक्ष्यवेधी ठरणार आहे.

आता जिल्ह्याला प्रकाशमयी दिवाळीची चाहूल लागली आहे. मूकबधिर मुलांच्या जीवनातील अंधकार दूर करणारी ही दिवाळी शाळेच्या रूपाने प्रकाश निर्माण करते. मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्याला फक्त शालेय शिक्षणच नव्हे तर कला, कौशल्याच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सर्वतोपरी मदत करते.


सध्या शाळेमध्ये मुख्याध्यापक गजानन रजपूत व कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दीपावलीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती सुरू आहे. साधारण गणेशोत्सवानंतरच या विद्यार्थ्यांना दीपावलीची चाहूल लागते आणि सर्व विद्यार्थी अगदी मावळे होऊन काम करतात. कलात्मकता आणि व्यवसायाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने गेली ४१ वर्षे हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

या विद्यार्थ्यांना बोलता येत नसले तरी हाताच्या बोटांच्या खुणांद्वारे संवाद साधतात. त्यांच्याकडच्या कलेतून ते आकर्षक वस्तू साकारून व्यक्त होत असतात. यंदा शाळेत वारली पेंटिंग, लाकडी बैलगाडी, सुगंधी उटणे, लाकडी की होल्डर, पणती स्टॅंड, पारंपरिक कंदिल, शुभेच्छापत्र, पाईल क्लिनरपासून बनवलेले शो पीस, कापडी पिशव्या, पायपुसणी, किल्ल्यांवर ठेवण्याकरिता मातीपासून बनवलेले मावळे, लाकडी घड्याळ शो पीस अशा अनेक वस्तू बनवल्या आहेत. सध्या काम अंतिम टप्प्यात आले आहे.


“प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या अनेकविध वस्तू पहायला मिळतात. त्यामुळे मूकबधिरत्व हे अपंगत्त्व न समजता समाजातील लोकांशी संवाद साधून आपल्या कौशल्यावर आधारित व्यवसाय करण्याचा धडा या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळतो. या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शाळा, संस्थेकडून नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली जाते.”

गजानन रजपूत, मुख्याध्यापक.

२ नोव्हेंबर पासून शाळेत प्रदर्शन

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचे ४१ वे हस्तकला प्रदर्शन २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत गाडीतळ येथील शाळेच्या सभागृहात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत आयोजित केले आहे. २ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष अॅड. प्रदीप परुळेकर, कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

9 Upcoming IPOs Opening This Week from October 26, 2026
IPO News : गुंतवणुकीची संधी! २६ ऑक्टोबरपासून 'या' ९ कंपन्यांचे आयपीओ खुले होणार, जाणून घ्या किंमत अन् तारखा
October 25, 2026
 Shri Devi Mauli Temple in Sonurli, Sawantwadi, famous for its annual Lotangan Jatra
प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला
October 25, 2026
 Kankavli Highway Police appeal to motorists to follow traffic rules and prevent road accidents in Sindhudurg.
“वेगापेक्षा जीवन अनमोल!” हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा
October 25, 2026
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारच्या विद्यार्थिनींचे यश
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

 Shri Devi Mauli Temple in Sonurli, Sawantwadi, famous for its annual Lotangan Jatra
प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला
October 25, 2026
 Kankavli Highway Police appeal to motorists to follow traffic rules and prevent road accidents in Sindhudurg.
“वेगापेक्षा जीवन अनमोल!” हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा
October 25, 2026
जबाबदार लोकप्रतिनिधी हेच ग्रामविकासाचे आधारस्तंभ
October 25, 2026
‘कोमप, गोवा’ तर्फे म्हापशात २५ रोजी कोजागरी महोत्सव
October 25, 2026