
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आम. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व जनहितोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपाचे युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा, केक किंवा सत्कारापुरता मर्यादित न राहता, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची संधी असावी, या भावनेतून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू व विशेष घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून त्यांच्या गरजा व अडचणी जाणून घेत त्यांच्यासोबत संवाद साधत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
याबाबत भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी असावी, या भावनेतून यंदा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी या भावनेतून उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी हे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये नागरिकांचा सहभाग राहणार आहे.










