LIVE UPDATES

दाभोळेत मनसेकडून गणपती विसर्जन घाटाची स्वच्छता

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 16:38 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  देवगड तालुक्यातील दाभोळे येथील गणपती विसर्जन घाटावर सहा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गाळ उपसा व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेद्वारे विसर्जन घाटाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, ग्रामस्थ बंड्या धुरी, उमेश राऊत, ग्रामसदस्य मनोहर लिमये यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

गणपती विसर्जन घाटाच्या स्वच्छता मोहिमेसाठी दाभोळेचे सरपंच श्रीकृष्ण अनुभवणे यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांनी आभार व्यक्त केले.