LIVE UPDATES

३०० वृक्ष, ३०० तिरंगे अन् ३०० फ्री गिफ्टला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

हृत्वि इलेक्ट्रॉनिक्स व बजाज फायनान्सचा स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक उपक्रम; ग्राहकांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 14:11 PM
views 79  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कणकवलीतील हृत्वि इलेक्ट्रॉनिक्स व बजाज फायनान्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३०० वृक्ष, ३०० तिरंगे आणि ३०० फ्री गिफ्ट वाटप उपक्रमाला नागरिक आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान नागरिकांना वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तर तिरंगा ध्वजाचे वाटप करून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्राहकांसाठी ३०० फ्री गिफ्टचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली यावेळी 

बजाज फायनान्स फ्रॅंचाईजी पार्टनर अमित सर्नोबत ,हृत्वी इले्ट्रॉनिक्सचे संचालक  संदेश राणे, नरेश राणे,बजाज फायनान्स ,ब्रांच मॅनेजर सागर जाधव, प्रसिद्ध अँकर बाळू वालावलकर ,बळीराम पवार, शुभम गाड, संतोष वारंग, सोहेल शेख, सिद्धेश राणे उपस्थित होते. 

यावेळी संदेश राणे यांनी बोलताना सांगितले की“फक्त व्यवसाय हाच आमचा उद्देश नाही. देशसेवा, सामाजिक बांधिलकी, समाजाबद्दल आपुलकी आणि प्रेम हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. व्यवसायासोबत समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील,” असे मत हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सचे संदेश राणे यांनी व्यक्त केले.

हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्राहकांनी मनापासून स्वागत केले. व्यवसायासोबत सामाजिक क्षेत्रातही अशाच प्रकारे उपक्रम राबवावेत, अशा शुभेच्छा देत ग्राहकांनी हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.राष्ट्रप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे कणकवलीत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिकच वाढला.