LIVE UPDATES

सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबत जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 13:10 PM
views 21  views

सिंधुदुर्ग : कोकणातील फळपिकांबाबत भेडसावणाऱ्या समस्या तसेच पर्यटनासंबंधी येणाऱ्या समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गोव्यातील दाभोळी विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे गोवा विमानतळावर पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अजित नाईक, मा.व्हि जे.एन टी जिल्हा अध्यक्ष अशोक पवार, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उमा वारंग, आलम खतिब शफिक खान, सचिव श्री. अणावकर, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीतील बदल व नारळ, काजू, आंबा यांसारख्या फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच कोकणातील फळांना चांगल्या प्रकारे भाव कसा मिळेल यावर चर्चा करण्यात आली. तसेच कोकणातील पर्यटन वाढीबद्दल येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पक्ष वाढीसाठी आवश्यक त्या गोष्टींवरही चर्चा करण्यात आली.