LIVE UPDATES

बाबू खरात यांची सभापती सिद्धेश रावराणेंनी घेतली भेट

आचिर्णेत विद्युत वाहिनीचा धक्क्यात झाले होते गंभीर जखमी ; नुकसान भरपाईसाठी पाठपुराव्याची ग्वाही
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 06, 2026 11:46 AM
views 610  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी  : आचिर्णे येथे तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या पशुपालक बाबू शामू खरात यांची सभापती सिद्धेश रावराणे व आचिर्णेचे माजी सरपंच रुपेश रावराणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री खरात यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.

  बुधवारी दुपारी विद्युत भारीत तुटलेल्या वाहिनीचा धक्का लागून बाबू खरात गंभीर जखमी झाले होते.तसेच त्यांच्या दोन शेळ्यांचा मृत्यू, तर काही शेळ्या जखमी झाल्या होत्या. या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या दुर्घटनेनंतर श्री खरात यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.सभापती श्री रावराणे यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जाऊन श्री खरात यांची भेट घेतली.त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.तसेच संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून नुकसान झालेल्या शेळ्यांची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही  दिली.