
सावंतवाडी : शिवसेनेच्या नेत्यांनी आज जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या विशेष भेटी दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. परब यांनी त्यांचे स्वागत केले.
श्री. परब यांच्या निवासस्थानी यावेळी नेत्यांचा पाहुणचार करण्यात आला. वरिष्ठ नेत्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निवासस्थानी आगमन होताच जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. यावेळी संजना परब, सभापती सुस्मिता जाधव, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, पं. स सदस्य मायकल डिसोझा, नगरसेविका स्नेहा नाईक, गुरू मठकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








