LIVE UPDATES

चौकुळ बेरडकीतील नुकसानग्रस्तांना शिवसेनेचा मदतीचा हात

जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक स्वरूपात मदत
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 16:14 PM
views 82  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ मऱ्हाटवाडी बेरडकी येथे झालेल्या वादळात तेथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. बेरडकी येथील नुकसानग्रस्त कुटुंबाना आज शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव ,अभिजीत मेस्त्री, युवा सामाजिक कार्यकर्ते आनंद (नंदू) गावडे,  बबन रेडकर, धनंजय गावडे, निखिल गावडे, यश गावडे, साई नाईक, उत्तम नाईक तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी आमदार दीपक केसरकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व लवकरात लवकर शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने तहसीलदारांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.