LIVE UPDATES

चेंदवण येथे दोन घरांवर कोसळले झाड

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला कुटुंबियांना धीर
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 17:54 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ:  सततच्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील स्थानिक रहिवासी योगेश मेस्त्री आणि विजय मेस्त्री यांच्या घरावर अचानक भलामोठा वृक्ष कोसळल्याने दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरांचे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने चेंदवण येथील दुर्घटनास्थळाला भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच अचानक ओढवलेल्या या संकटामुळे खचून गेलेल्या मेस्त्री कुटुंबातील सदस्यांना भेटून त्यांना धीर दिला व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, भाजप कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन सावंत, भाजप तालुका उपाध्यक्ष राजा धुरी यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे पंचनामे होऊन पीडित कुटुंबांना प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील असेही यावेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.